रविवारच्या निवांत सकाळी, दूरदर्शनची रंगोली पाहतांना होळीच्या जाहिरातीने (#KhulKeKheloHoli)मन वेधून घेतले. एका वृध्दाश्रमात, सगळी वयस्कर मंडळी गप्पांमध्ये रंगलेली असतात. मात्र एक आजोबा वृध्दाश्रमात चालेली रंगांची तयारी पाहून हरकून जातात. जरा इकडे तिकडे जाऊन वेध घेतात आणि विविध रंग त्यांच्या नजरेस पडतात. मग काय, त्यांच्यातले लहान मूल जागे होते. हळूच रंग चोरुन खिशात टाकतात. वृध्दाश्रमातली त्यांची मैत्रिण मात्र हे सगळं पहात असते. आजोबा आता मित्रांना रंग लावायची संधीच शोधत असतात. तेव्हाच तरुण मुल-मुली सगळ्यांना भेटायला येतात. सगळ्यांना सावरत, जपत, टिळा लावत, मिठाई भरवत, शुभेच्छा देत, 'होळी' साजरी करतात. आजोबांना मात्र अशी जपून-सावरुन साजरी केलेली फॉर्मल होळी अजिबात आवडत नाही. त्यांच्या चेह-यावर निराशा स्पष्ट दिसते. इतक्यात त्यांची मैत्रिण येते आणि ध्यानीमनी नसतांना संपूर्ण चेह-यावर रंग फासते. आजोबा आणि जमलेले सगळेच आश्चर्यचकित होतात आणि मैत्रिण खट्याळपणे म्हणते , " एक चुटकीसे क्या होगा ? खूल के खेलो होली ! "
होळीच्या विविध रंगांसारखीच ही जाहिरात जीवनाचा विविध प्रकारे विचार करायला लावते. रोजच्या आयुष्याच आपलं जगणंही असंच सावरत, मोजून-मापून. आपल्यात दडलेल्या मुलाला अनेक गोष्टी करुन बघायच्या असतात. शेजारच्या बागेतली फुलं चोरायची असतात, फळं तोडायची असतात, मोठ्याने ओरडून गाणं म्हणायचं असतं, ऑफिसमध्ये खदखदून हसायचंही असत. पण आपण मात्र "सॉरी, एक्सक्यूज मी, इट्स ओके....", अश्या ब-याच फॉर्मॅलिटिजमध्ये अडकून पडतो. वेळोवेळी ह्या मुलाला दटावतो, गप्प करतो आणि मोकळेपणाने जगायचे नाकारतो.
होळीच्या निमित्ताने मिळालेला हा ’खुल के जियो’ चा संदेश लक्षात ठेऊन मोकळेपणाने जगायला काय हरकत आहे ? तुम्हाला काय वाटते ?