रविवारची संध्याकाळ! दुस-या दिवशी दहावीचा इतिहासाचा पेपर असल्याने मला अभ्यास संपवायची घाई होती कारण सहा वाजता दूरदर्शनवर ’सागर’ लागणार होता...
मग कधीतरी नसीर-शबानाचा ’मासूम’ पाहतांना... छोटी आराधना जोरजोरात "ओम शांती ओम..." म्हणतांना आई रागावून टिव्ही बंद करते. ऑफिसमधून दमून आलेल्या नसीरला आराधना तक्रार करते की "पापा, ममा मुझे चिंटूमामा के गाने देखने नहीं दे रही". चिंटू मामा हे नाव भारीच आवडलं मला. असा हा ऋषी कपूर मधून मधून भेटत होताच.
पण मला पहिल्यांदा तो आवडला चांदनी मध्ये! सिनेमा अर्थातच श्रीदेवीचा होता. मात्र "मेहबूबा..." अशी बिनधास्त
आरोळी ठोकत आपल्या प्रेयसीला दिल्ली शहर घुमवणारा आणि उत्तरार्धात केवळ प्रेयसीसाठी अपंगावर मात
करण्यासाठी तगमगणारा रोहित त्याने खासच उभा केला होता. पण तरीही लक्षात राहिले विविध स्वेटर्समधले त्याचे लाभस रुप. चांदनीत ऋषी आवडल्याने त्याचे जुने सिनेमेही पहायचे ठरवले. दूरदर्शनच्या कृपेने खेल खेल में, रफू चक्कर, बॉबी, मेरा नाम जोकर वगैरे पाहिले. त्यातली गाणी अप्रतिम होतीच, पण मला ऋषी इतका भावला नाही. मग ’ये वादा रहा’ पाहिला आणि ऋषी माझा आवडता नट झाला, कायमचाच! त्याच दशकात मागे पुढे आलेले कभी-कभी, कर्ज, जमाने को दिखाना है, दीदार-ए-यार, प्रेम रोग, दूसरा आदमी, बडे दिलवाला, सितमगर, सागर, नसीब अपना अपना ... ह्या सिनेमातून तो आवडतच गेला.
अभिनय तर चांगलाच असायचा मात्र नृत्यातली सहजता, लीप सिन्कींग, गाण्यावरचा मुद्राभिनय अफलातून
असायचा. ऋषीला अनेकदा स्टेजवरुन नाच-गाणी (सिनेमात) करायची संधी मिळाली. ओम शांती ओम, बचना ए हसिनो, हम तो आपके दिवाने है, आ मिल जा मैफिल है तेरे कदमों मे, हमने तुमको देखां, परदा है परदा, दिल लेना खेल है दिलदार का, सोचेंगे तुम्हे प्यार करें के नही... ह्या सगळ्या गाण्यांत ऋषीने नृत्याच्या सहज हालचाली
आणि प्रचंड उर्जेने संपूर्ण स्टेज व्यापून टाकले आहे. गाण्यात जर वाद्ये जसे की डफली, गिटार, व्हायोलिन, ट्रम्पेट, पियानो, बासरी वगैरे वाजवायची असतील तर त्याचा चपलख अभिनय करायचा तो ऋषीच! जणू त्याला ही वाद्ये उपजतच वाजवता येतात. ऋषीचे नृत्य म्हणजे हातापायाच्या आणि चेह-याच्या सहज हालचाली. त्यात कुठेही कवायत नसायची. त्यामुळे गाण्यात कितीही गोड अभिनेत्री किंवा नृत्यांगना असली तरी ऋषी लक्ष वेधून घ्यायचा. आठवा गाणी... मौसम प्यार का, तेरी इसी अदा पे सनम, दर्द ए दिल, रंग भरे बादल से, चंद रोज और मेरी जा चंद रोज, ऐसा कभी हुआ नहीं, कहीं ना जा... यादी मोठी आहे.
आपल्या चॉकलेट बॉय इमेजला हटकून नकारात्मक छटा असणा-या भूमिकाही ऋषीने आवर्जून केल्या. खोज, बोल राधा बोल आणि अगदी अलीकडचा अग्नीपथ. दोन किंवा जास्त नायक असणा-या सिनेमातही तो
सहनायकासमोर तोडीसतोड उभा रहायचा. अमिताभ बरोबर अमर, अकबर, अॅंथनी, नसीब, कुली, अजूबा, १०२ नॉट आऊट, विनोद खन्नाबरोबर चांदनी, कमल हसन बरोबर सागर, नाना पाटेकर बरोबर हम दोनो, दीदार-ए-यार मध्ये जितेंद्र, अनिल कपूरबरोबर विजय... असे कितीतरी चित्रपट. ९० च्या दशकात कौटूंबिक सिनेमांची लाट
होती, त्यामुळे अनेक नायक/नायिका एकाच चित्रपटात असायचे. ऋषीने घराना, घर घर कहानी, बडे घर की बेटी, पराया घर, घर परिवार, अमिरी-गरीबी, साजन का घर अश्या सिनेमातही कामं केली आहेतच की. नायिका प्रधान चित्रपटातही ओव्हरपॉवर न होता ऋषी आपला आब राखून असायचा, एक चादर मैलिसीमध्ये हेमा मालिनीचा दीर ते नवरा हा त्याचा मानसिक प्रवास लाजवाब. कसक मध्ये दुखावलेला नवरा रंगवतांना नीलमपेक्षा ऋषीच जास्त लक्षात रहातो, दूसरा आदमी मध्ये राखीसमोर तो आत्मविश्वासपूर्ण उभा राहिलाय, प्रेमरोगमध्ये प्रेयसीचे दु:ख समजून घेणारा मित्र तर आपली बायको बरोबर असूनही आपल्याला तिला साथ देता येत नाही ह्याची खंत त्याने दामिनीत तितक्याच ताकदीने दाखवली आहे.
तरुण चेह-याची देणगी लाभल्याने चाळिशी ओलांडूनही नवीन नायिकांबरोबर भूमिका ऋषीने केल्यात, जसे साहिबा (माधुरी दीक्षित), दरार (जूही चावला), पहला पहला प्यार (तब्बू), श्रीमान आशिक (उर्मिला मातोंडकर), साजन की बाहोंमे (रवीना टंडन), बडे घर की बेटी (मिनाक्षी शेषाद्री), दिवाना (दिव्या भारती), अनमोल (मनिषा कोईराला). काळाची पावलं ओळखून मग मात्र त्याने आपल्या वयाला साजेश्या भूमिका केल्या. लव्ह आज कल, फना, नमस्ते लंडन, लक बाय चान्स, दिल्ली - ६, प्यार मे ट्विस्ट, दो दुनी चार... वगैरे, मात्र त्यातही वैविध्य होते. स्टुडंट ऑफ द इयर मध्ये वेगळा शिक्षक, बेवकुफियॉं मधला वैतागलेला सासरा, बेशरम मधला पोलिस, हाऊसफुल्लची २ ची कॉमेडी असे वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट केले. त्यानंतर आपल्या वयापेक्षा मोठया म्हणजे म्हाता-यांच्या भूमिकाही त्याने कपूर अॅन्ड सन्स, १०२ नॉट आऊट मध्ये वठवल्या.
दोन नायिकांबरोबर मात्र त्याने तारुण्यात आणि म्हातारपणातही नायकच रंगवला. नीतू सिंग बरोबर तो खेल खेल में, रफू चक्कर, झूठा कहींका मध्ये अल्लड तरुण नायक होता तर दो दुनी चार मध्ये मध्यमवयीन नायक. ह्या मधला मध्यमवर्गीय पंजाबी शिक्षक दुग्गल सर ऋषीने खूपच प्रभावी उभा केला. त्याने डिंपल कपाडियाबरोबर बॉबीने कारकिर्दीची सुरुवात केली, मध्यम वयात सागर केला आणि प्रौढ वयात प्यार में ट्विस्ट ! ह्या तिन्ही चित्रपटांत, वेगवेगळ्या दशकात, ऋषी डिंपलचा नायकच होता. मोटर सायकलवर फिरतांना, खुल्लम खुल्ला ह्या रिमिक्स गाण्यावर दोघांना नाचतांना बघून प्रेक्षक आपल्या ह्या नायकाचे वयच विसरले.
सतत काम करणे, आलेल्या कामात आपल्यातील बेस्ट देणे त्यामुळेच बदलत्या काळाशी ऋषी जमवून घेऊ शकला आणि त्याच्या चाहत्यांना विविध भूमिका बघायला मिळाल्या. चार दशकं चित्रपटसृष्टीत घालवल्यामुळे प्रत्येक पिढीच्या प्रेक्षकांत त्याचे चाहते आहेत. माझ्यासाठी मात्र ऋषी अजून ८० ते ९०च्या दशकातलाच आहे. देखणा, लोभस, किशोरच्या (क्वचित रफी किंवा शैलेंद्र) आवाजातल्या गाण्यांमधून भेटणारा. त्याने आता आपल्या प्रवासाची वाटच बदलली म्हणून विचारावेसे वाटते, "कहो कैसे रस्ता भूल पडे ? अच्छे तो हो दिलबर जान!"
- भाग्यश्री केंगे
bhagyashree@cyberedge.co.in
सदर लेख हा पूर्णत:हा वैयक्तिक मतांवर आधारीत आहे.
मग कधीतरी नसीर-शबानाचा ’मासूम’ पाहतांना... छोटी आराधना जोरजोरात "ओम शांती ओम..." म्हणतांना आई रागावून टिव्ही बंद करते. ऑफिसमधून दमून आलेल्या नसीरला आराधना तक्रार करते की "पापा, ममा मुझे चिंटूमामा के गाने देखने नहीं दे रही". चिंटू मामा हे नाव भारीच आवडलं मला. असा हा ऋषी कपूर मधून मधून भेटत होताच.
करण्यासाठी तगमगणारा रोहित त्याने खासच उभा केला होता. पण तरीही लक्षात राहिले विविध स्वेटर्समधले त्याचे लाभस रुप. चांदनीत ऋषी आवडल्याने त्याचे जुने सिनेमेही पहायचे ठरवले. दूरदर्शनच्या कृपेने खेल खेल में, रफू चक्कर, बॉबी, मेरा नाम जोकर वगैरे पाहिले. त्यातली गाणी अप्रतिम होतीच, पण मला ऋषी इतका भावला नाही. मग ’ये वादा रहा’ पाहिला आणि ऋषी माझा आवडता नट झाला, कायमचाच! त्याच दशकात मागे पुढे आलेले कभी-कभी, कर्ज, जमाने को दिखाना है, दीदार-ए-यार, प्रेम रोग, दूसरा आदमी, बडे दिलवाला, सितमगर, सागर, नसीब अपना अपना ... ह्या सिनेमातून तो आवडतच गेला.
अभिनय तर चांगलाच असायचा मात्र नृत्यातली सहजता, लीप सिन्कींग, गाण्यावरचा मुद्राभिनय अफलातून
आणि प्रचंड उर्जेने संपूर्ण स्टेज व्यापून टाकले आहे. गाण्यात जर वाद्ये जसे की डफली, गिटार, व्हायोलिन, ट्रम्पेट, पियानो, बासरी वगैरे वाजवायची असतील तर त्याचा चपलख अभिनय करायचा तो ऋषीच! जणू त्याला ही वाद्ये उपजतच वाजवता येतात. ऋषीचे नृत्य म्हणजे हातापायाच्या आणि चेह-याच्या सहज हालचाली. त्यात कुठेही कवायत नसायची. त्यामुळे गाण्यात कितीही गोड अभिनेत्री किंवा नृत्यांगना असली तरी ऋषी लक्ष वेधून घ्यायचा. आठवा गाणी... मौसम प्यार का, तेरी इसी अदा पे सनम, दर्द ए दिल, रंग भरे बादल से, चंद रोज और मेरी जा चंद रोज, ऐसा कभी हुआ नहीं, कहीं ना जा... यादी मोठी आहे.
आपल्या चॉकलेट बॉय इमेजला हटकून नकारात्मक छटा असणा-या भूमिकाही ऋषीने आवर्जून केल्या. खोज, बोल राधा बोल आणि अगदी अलीकडचा अग्नीपथ. दोन किंवा जास्त नायक असणा-या सिनेमातही तो
होती, त्यामुळे अनेक नायक/नायिका एकाच चित्रपटात असायचे. ऋषीने घराना, घर घर कहानी, बडे घर की बेटी, पराया घर, घर परिवार, अमिरी-गरीबी, साजन का घर अश्या सिनेमातही कामं केली आहेतच की. नायिका प्रधान चित्रपटातही ओव्हरपॉवर न होता ऋषी आपला आब राखून असायचा, एक चादर मैलिसीमध्ये हेमा मालिनीचा दीर ते नवरा हा त्याचा मानसिक प्रवास लाजवाब. कसक मध्ये दुखावलेला नवरा रंगवतांना नीलमपेक्षा ऋषीच जास्त लक्षात रहातो, दूसरा आदमी मध्ये राखीसमोर तो आत्मविश्वासपूर्ण उभा राहिलाय, प्रेमरोगमध्ये प्रेयसीचे दु:ख समजून घेणारा मित्र तर आपली बायको बरोबर असूनही आपल्याला तिला साथ देता येत नाही ह्याची खंत त्याने दामिनीत तितक्याच ताकदीने दाखवली आहे.
तरुण चेह-याची देणगी लाभल्याने चाळिशी ओलांडूनही नवीन नायिकांबरोबर भूमिका ऋषीने केल्यात, जसे साहिबा (माधुरी दीक्षित), दरार (जूही चावला), पहला पहला प्यार (तब्बू), श्रीमान आशिक (उर्मिला मातोंडकर), साजन की बाहोंमे (रवीना टंडन), बडे घर की बेटी (मिनाक्षी शेषाद्री), दिवाना (दिव्या भारती), अनमोल (मनिषा कोईराला). काळाची पावलं ओळखून मग मात्र त्याने आपल्या वयाला साजेश्या भूमिका केल्या. लव्ह आज कल, फना, नमस्ते लंडन, लक बाय चान्स, दिल्ली - ६, प्यार मे ट्विस्ट, दो दुनी चार... वगैरे, मात्र त्यातही वैविध्य होते. स्टुडंट ऑफ द इयर मध्ये वेगळा शिक्षक, बेवकुफियॉं मधला वैतागलेला सासरा, बेशरम मधला पोलिस, हाऊसफुल्लची २ ची कॉमेडी असे वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट केले. त्यानंतर आपल्या वयापेक्षा मोठया म्हणजे म्हाता-यांच्या भूमिकाही त्याने कपूर अॅन्ड सन्स, १०२ नॉट आऊट मध्ये वठवल्या.
दोन नायिकांबरोबर मात्र त्याने तारुण्यात आणि म्हातारपणातही नायकच रंगवला. नीतू सिंग बरोबर तो खेल खेल में, रफू चक्कर, झूठा कहींका मध्ये अल्लड तरुण नायक होता तर दो दुनी चार मध्ये मध्यमवयीन नायक. ह्या मधला मध्यमवर्गीय पंजाबी शिक्षक दुग्गल सर ऋषीने खूपच प्रभावी उभा केला. त्याने डिंपल कपाडियाबरोबर बॉबीने कारकिर्दीची सुरुवात केली, मध्यम वयात सागर केला आणि प्रौढ वयात प्यार में ट्विस्ट ! ह्या तिन्ही चित्रपटांत, वेगवेगळ्या दशकात, ऋषी डिंपलचा नायकच होता. मोटर सायकलवर फिरतांना, खुल्लम खुल्ला ह्या रिमिक्स गाण्यावर दोघांना नाचतांना बघून प्रेक्षक आपल्या ह्या नायकाचे वयच विसरले.
- भाग्यश्री केंगे
bhagyashree@cyberedge.co.in
सदर लेख हा पूर्णत:हा वैयक्तिक मतांवर आधारीत आहे.
No comments:
Post a Comment