Tuesday, February 20, 2018


मी तर ठीक आहे ना!

Translated by Bhagyashree Kenge
Original story At Least I'm Okay! 
Published by Pratham Books
उना, ही डोंगरी बकरी, नयनरम्य अशा साकूलँडमध्ये डोंगरमाथ्यावर राहात होती. तिथल्या प्राण्यांना त्यांचं घर आवडायचं. मात्र एके दिवशी हवामानातील बदलांमुळे तिथल्या प्राण्यांना त्यांचं घर सोडून द्यावं लागलं. ही गोष्ट आहे बदलतं हवामान आणि निसर्गावर आणि प्राण्यांवर होणार्‍या त्याच्या परिणामांची.


सुंदर चमत्कार, फिबोनाची अंकांचा!

Translated by Bhagyashree Kenge
Published by Pratham Books
हजारो वर्षांपूर्वी हेमचंद्र नावाच्या भारतीय विद्वानाने वैशिष्टयपूर्ण असा अंकांचा क्रम शोधून काढला. त्यानंतर एका शतकानं, इटालियन गणिती फिबोनाची याचेही त्याकडे लक्ष वेधले गेले व त्याने तो क्रम प्रसिध्द केला. त्या गणिती क्रमांना पुढे फिबोनाकी क्रम असे नाव मिळाले. समजायला अतिशय सोपा असलेला हा गणिती क्रम निसर्गातही आपल्याला फुलांमध्ये, शिंपल्यांमध्ये, अंडयांमध्ये, बियांमध्ये, चांदण्यांमध्ये ... पाहायला मिळतो. ह्या पुस्तकात ह्या क्रमाविषयी आणखीन थोडं जाणून घेऊ यात, चला तर मग ...


आजीची चकित करणारी यंत्रं

Translated by Bhagyashree Kenge
Original story Ammachi's Amazing Machines 

Published by Pratham Books
खोब-याच्या वडया करणं किती मजेशीर आहे, माहिती आहे तुम्हाला? तुम्हीपण सूरज आणि कल्पक अम्माचीबरोबर खोब-याच्या वडया बनवण्याच्या ह्या रोमहर्षक प्रयोगात सामील व्हा. त्यांनी एक नाही तर सहा साधी यंत्रं, फार छान प्रकारे वापरली आहेत.


भीतीदायक मिठाईवाला


Published by Pratham Books
समर आणि निव्या भीतीदायक मिठाईवाल्याला खूप घाबरत असतात. पण जसा तो दिसतो, तसा तो खरंच इतका भीतीदायक आहे का? आणि हो शिवाय तो नाश्त्याला कुत्र्याची पिल्लंसुद्धा खातो का? जेव्हा कुत्र्याची ६ पिल्लं भीतीदायक मिठाईवाल्याच्या दुकानात शिरतात, तेव्हा या जुळ्या भावंडांना त्यांची सुटका करायची असते. पण त्यांना एक मोठ्ठा आश्चर्याचा धक्का बसतो!

अवनी आणि वाटाण्याचं रोपटं

Translated by Bhagyashree Kenge
Original story Avani and the Pea Plant 

Published by Pratham Books
कोणी लावलं वाटाण्याचं झाड? अवनीला माहिती नाही. तिच्या आईलाही माहिती नाही. मात्र तुम्ही हे पुस्तक वाचलंत तर वाटाण्याचं हे झाड कोणी लावलं हे तुम्हाला नक्कीच कळेल.


काय बरं घालू आज?

Translated by Bhagyashree Kenge
Original story What Shall I Wear Today?
Published by Pratham Books
आता कपडे तरी कोणते घालावेत बरं?’ असा कधी कधी पेच पडतो. हवे तसे कपडे सापडण्याआधी या गोष्टीतल्या मुलीनं बघा बरं, काय काय घालून बघितलंय?

अनूला काय काय दिसतं?

Translated by Bhagyashree Kenge
Original story What Does Anu See? 

Published by Pratham Books
अनूला काय काय दिसतं? अनू तिच्या अवतीभवती खूप छानछान गोष्टी बघत असते. त्या गमती-जमती कदाचित तुम्हालाही दिसतील.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...